यशवंत विद्यालय अल्लीपूर येथे विध्यार्थ्यांना कला साहित्य वाटप

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून अलीपुर येथील महिला युवा उद्योजक समूहातर्फे यशवंत विद्यालय अल्लीपूर येथे विध्यार्थ्यांना कला साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कोठेकर सर तसेच महिला युवा उद्योजक समूहाच्या पूनम चंदनखेडे,वैशाली सावरकर,निकिता लांबट,प्रिया कापसे,योगिता सावळे, शिवानी शेंडे, रोहिणी कलोडे,शुभांगी कलोडे,राणी ताई चेचरे,अश्विनी धोंगडे उपस्थित होते या कार्यक्रमाला प्राचार्य रविन्द्र कोठेकर सर यांनी संबोधित केले ते म्हणाले की असेच गावातील महिलांनी होतकरू मुलांना मदत करायला पाहिजे आणि त्यांना कलेकरिता वाव मिळाला पाहिजे असेच कार्यक्रम गावातील महिलांनी घेतले पाहिजे आणि समाजात प्रेरणास्थान मिळवायला पाहिजे.सदर कार्यक्रमाकरिता महिला युवा उद्योजक परिवाराने परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन कडू मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मेश्राम मॅडम यांनी केले